पतीची हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत ठेवला. अंत्यसंस्कार सुरू केले; परंतु मुलीनेच अखेर आईच्या कृष्णकृत्याची माहिती नातेवाइकांना दिली.

दोन दिवस पत्नी बाहेरगावी निघून गेली. अखेर नातेवाइकांनीच पोलिसांना कळविल्यामुळे खुनाला वाचा फुटली.

मारहाण करणा-या पतीचा काढला काटा

गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका महिलेनं लाकडी दाड्यानं मारहाण करत आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Advertisement

हत्या केल्यानंतर पतीनं आत्महत्या केल्याचा बनाव आरोपी पत्नीनं रचला; पण आरोपी महिलेच्या मुलीमुळे हत्येचं गूढ समोर आलं आहे.

याप्रकरणी मृताच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे.

काय घडले ?

दीपक बलवीर सोनार असं हत्या झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे, तर राधिका दीपक सोनार असं अटक केलेल्या आरोपी पत्नीचं नाव आहे.

Advertisement

मृत दीपक सोनार हे पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका जुन्या वाड्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर आरोपी राधिका या एका कपड्याच्या दुकानात काम करतात.

मृत दीपकला दारूचं व्यसन आहे. सायंकाळी दारू पिऊन घरी आल्यानंतर, अनेकदा दीपक अनेकदा विविध कारणांवरून पत्नी राधिकासोबत वाद उकरून काढतो. यामुळे दोघांत अनेकदा कडाक्याची भांडणंदेखील झाली आहेत.

मद्यपी पतीचा दाबला गळा

दीपक नेहमीप्रमाणे रात्री दारू पिऊन घरी आला. सोमवारीही किरकोळ कारणांतून त्यांच्यात वाद झाला. यामुळे संतापलेल्या राधिकानं मद्यधुंद असणाऱ्या दीपकला लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्याचा गळा दाबला.

Advertisement

यामुळे दीपकचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी पत्नी राधिकानं पतीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला आणि दीपकचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला.

यानंतर आरोपी राधिक दोन दिवसांसाठी घराबाहेर निघून गेल्या. दोन दिवसांनी घरी परतल्यानंतर त्यांनी दीपकनं आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.

पोलिसांच्या ताब्यात राधिका

दीपक यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना, त्यांच्या मुलीनं वडिलांची आईनं हत्या केल्याची माहिती काही नातेवाइकांना दिली.

Advertisement

हत्येचं गूढ उलगडताच नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत, आरोपी पत्नी राधिका सोनार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतलं आहे.