मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे नेत्यांमागे ईडी (ED) कशी लावतात हे देखील सांगितले आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप देखील नवाब मलिक यांनी केले आहेत.

पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे.

Advertisement

इतकच काय आगामी काळात केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ असा दावा करतानाच ईडीचा (ED) ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे.

प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचे मार्गदर्शन ते ईडी अधिकार्‍यांना करत आहेत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना ईडीचा ओएसडी करून टाका. राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे.

Advertisement

त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्यामागेही लावत आहेत. भाजपला वाटतेय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे असेही नवाब मलिक म्हणाले.