फेसबुकच्या माध्यमातून मैत्रीवर विश्वास ठेवणे पुण्यामध्ये गेल्या वर्षी अडीचशे महिलांना व पुरुषांना महागात पडले आहे. यामध्ये त्यांना समोरील व्यक्तीकडून वेगवेगळ्या कारणांवरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

सध्याच्या युगात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला व पुरुष सर्वजण स्मार्टफोन्स वापरतात. व सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीला यातील खूप जण बळी पडतात.

देशांमध्ये सायबर गुन्हेगारी प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत असून यामध्ये अनेकांची फसवणूक झालेली आहे. पुणे शहरामध्ये फेसबुकवरून अनोळखी व्यक्तीसोबत संवाद वाढवणे हे 248 जणांना चांगलेच महागात पडले आहे.

यातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा सायबर पोलीस कसून तपास करत आहेत. फेसबुकवरून बनावट अकाउंट चालू करून हे गुन्हेगार सर्वांना रिक्वेस्ट सेंड करत असतात.

यातून रिक्वेस्ट स्वीकारणाऱ्याना ते त्यांच्या जाळ्यामध्ये ओढतात. त्यानंतर सायबर चोरटे व्यक्तींशी संपर्क वाढवितात. व ते परदेशात मोठ्या पदावर काम करत असल्याचे सांगून परदेशात महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगत ते सोडवून घेण्यासाठी पैसे भरायला लावतात.

सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी आपण अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, व रिक्वेस्ट पाठवू देखील नये. तसेच सोशल मीडियावर आर्थिक व्यवहार करणे कमी करावे.

व स्वतःची माहिती कोणाला दिसेल अशी ठेवू नये. आणि अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये. आणि जर फसवणूक झाली तर लवकर पोलिसांचा सल्ला घ्यावा ही काळजी घेतली पाहिजे.