मुंबई – बॉलिवूड सिनेस्टार ‘मलायका अरोरा’ (Malaika Arora) आणि ‘अर्जुन कपूर’ (Arjun Kapoor) बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या स्टार कपलने आपले प्रेम उघडपणे जाहीर केले आहे. तेव्हापासून सर्वांच्या नजरा या स्टार कपलवर लागल्या आहेत. नुकतंच बॉलिवूडची फॅशन आयकॉन मलायका अरोरा (Malaika Arora) तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) एका कार्यक्रमात पोहोचली. यादरम्यान, दोन्ही स्टार्सनी रेड कार्पेटवर एन्ट्री मारताच सर्व लाइमलाइट चोरले.

या फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही स्टार्स एकमेकांसोबत दिसले. दोन्ही स्टार्सने एकाच रंगाचा पोशाख परिधान केला होता.

अर्जुन कपूरने स्काय ब्लू कलरच्या कोट-पँटमध्ये दिसला होता. तर मलायका अरोराने त्याच रंगाचा पारदर्शक टॉप असलेला बिझनेस सूट कॅरी केला होता.

ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा हात पकडून परफेक्ट कपलप्रमाणे रेड कार्पेटवर एन्ट्री करताना दिसले. हा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.

दरम्यान, काही इंटरनेट युजर्सना या स्टार कपलची ही शैली आवडली नाही. असो, या दोघांच्या नात्याबद्दल लोक अनेकदा ट्रोल करतात.

या व्हिडिओवर कमेंट करताना एका इंटरनेट यूजरने लिहिले की, ‘आंटी विथ बेबी अर्जुन’ तर एका इंटरनेट यूजरने ‘आई आणि मुलगा एकत्र फिरत आहेत’ असे लिहिले आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या वयातील प्रचंड फरकामुळे हे स्टार कपल चाहत्यांच्या डोळ्यात अंजन घालते. तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या प्रकारच्या अनेक कमेंट पाहू शकता.