ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मंचरचे उपजिल्हा रुग्णालय दोनशे खाटांचे

राज्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांचा दर्जा वाढवून त्यांच्यासाठी लागणा-या पदांच्या मान्यतेस आरोग्य विभागाने मान्यता दिली. आता आदिवासी भागातील रुग्णांसाठी महत्वाच्या असलेल्या मंचरच्या रुग्णालयाची श्रेणी वाढविण्यात आली आहे.

खाटांची संख्या दुप्पट

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासीबहुल तालुक्यांसाठी मध्यवर्ती असणाऱ्या मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांवरुन 200 खाटांच्या श्रेणीवर्धन करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मान्यता दिली.

मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या खाटांच्या श्रेणीवर्धनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडली.

हे होते उपस्थित

या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास उपस्थित होते.

आदिवासींची सोय

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुके हे आदिवासी बहुल आणि दुर्गम तालुके आहेत. या तिन्ही तालुक्यातून पुणे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण दूर आहे.

याचा विचार करुन या तिन्ही तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मंचर, (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांवरून दोनशे खाटांचे श्रेणीवर्धन करण्याच्या प्रस्तावाला पवार यांनी तत्वत: मान्यता दिली.

या उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढल्याने आदिवासी बांधवांसह या भागातील सामान्य जनतेची मोठी सोय होणार आहे

You might also like
2 li