ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

चक्क ! टीव्हीसाठी विवाहितेचा छळ पती, दीर आणि सासूविरोधात गुन्हा

२१ व्या शतकात देखील अनेक ठिकणी घरातील किरकोळ वस्तू घेण्यासाठी अनेकवेळा विवाहितेचा छळ करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता तर चक्क सोफासेट, टीव्ही घेण्यासाठी तसेच घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे.

या प्रकरणी रविवारी (दि.२०) पतीसह सासरच्यांवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, दीर आणि सासू (सर्व रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर २०२० ते २० जून २०२१ या कालावधीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.पीडित विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी तिला घरात व्यवस्थित काम करत नाही, तसेच सोफासेट, टीव्ही माहेरहून आणण्यासाठी, घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी व इतर कारणांसाठी पैशांची वेळोवेळी मागणी केली.

त्यावरून आरोपींनी पीडित महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पैसे देण्यास नकार दिल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

You might also like
2 li