पिंपरी : विवाहितेने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ घडली.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे उघड झाले असून या प्रकरणी शनिवारी (दि.१९) सासरच्यांवर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे –

पती विजय सुदाम सोनवणे, सासु कांताबाई सुदाम सोनवणे, ननंद माया विशाल कांबळे, दीर संजय सुदाम सोनवणे, दीर सचिन सुदाम सोनवणे (सर्व रा. शेवाळे सेंटरजवळ, पिंपरी)

अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शारीरिक आणि मानसिक त्रास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मुलगी आरोपींच्या घरात नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून तिला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.

धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

त्रासाला कंटाळून विवाहितेने २३ एप्रिल रोजी देहूरोड रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी विवाहितेच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो देहूरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.