file photo

पुणे: जुनं ते सोनं म्हणतात, त्याचा प्रत्यय कधी कधी येत असतो. इतर बाबतीत घडणा-या घटना वैद्यकीय बाबतीत जेव्हा प्रत्ययाला येतात, तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

कोरोनाच्यातिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना देण्यात येणारी मीजल्स लस (गोवर लस) कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यात प्रभावी ठरत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयानं याबद्दलचं संशोधन केलं आहे.

नव्या व्हेरिएंटविरोधातही प्रभावी

कोरोनाच्या संक्रमणापासून सुरुवातीला लहान मुलांचं संरक्षण करण्याचं काम करण्यात मीजल्स लस सक्षम असल्याचं संशोधन सांगतं.

Advertisement

या सर्वेक्षणात १ ते १७ वर्षांपर्यंतच्या ५४८ जणांचा समावेश होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुलांचे दोन गट करण्यात आले होते.

कोरोनाची लागण झालेले आणि कोरोनाची बाधा न झालेले अशा दोन गटांत मुलांची विभागणी करण्यात आली होती. मीजल्स लस SARS-Co-V-2 विरोधात ८७ टक्के प्रभावी असल्याचं संशोधनातून समोर आलं.

३६ वर्षांपासून वापरात

वयस्करांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मीजल्स आणि बीसीजी लस घेतली असल्यानं लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होते.

Advertisement

मीजल्स लस गेल्या ३६ वर्षांपासून भारताच्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे.