पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांची शिवजयंतीच्या तयारी निमित्त महापालिका भवन (Pune Mahapalika Bhavan) येथे समन्वय बैठक झाली आहे. या बैठकीत राज्यशासनाने (state government) शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी देण्याबाबत तसेच इतर गोष्टींवर चर्चा झाली आहे.

या बैठकीत मोहोळ म्हणाले की, मागील दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती, गणेशोत्सव आदी उत्सव आपण संयम आणि उत्साहात साजरी केली गेली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे.

राज्य शासनाने अद्याप गर्दीबाबतचे नवीन आदेश दिलेले नाहीत. ते आदेश येत्या काही दिवसांत येतील. त्यानुसार आपण शिवजयंती उत्सव साजरा करूयात. सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

Advertisement

तसेच त्यांनी पुढे सांगितले की शिवजयंती उत्सवामध्ये मिरवणुकीला परवानगी देणार असाल तर शिवाजी रस्त्यावर सध्या सुरू असलेले काम थांबवावे. पोलीस ठाण्यात मंडळांचे अर्ज स्वीकारून तातडीने परवानगी द्यावी.

किंवा ऑनलाईन (Online) परवानगी देण्याची व्यवस्था निर्माण करावी. शिवजयंती निमित्त शाळांमध्ये स्पर्धा आयोजित कराव्यात. राजकीय सभा आंदोलनांना परवानगी दिली जाते मग मिरवणुकीला का नाही ? ही बाब सरकार पर्यंत पोहोचवावी. असे त्यांनी सांगितले आहे.

याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ (Dipali Dhumal) आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement