मुलगी झाली म्हणून विवाहीत महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करुन नांदविण्यास नकार दिल्या प्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२० ते १० मे २०२१ दरम्यान घडला. पीडित महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती जगदीश नारायण मैलारफ (रा. परांडेनगर, दिघी),
सासु लक्ष्मी नारायण मैलारफ (वय ५५), नणंद सरस्वती (रा. हैद्राबाद) व नणंदचे पती श्रीनिवास (वय ४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement