पुणे – गेल्या आठवड्यात दीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या (maharashtra) बहुतांश भागात मोसमी पाऊस (monsoon) भागात पुढील काही दिवस जोरधारा कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. आणि याच अंदाजानुसार पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे शहर (pune) आणि परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्र (Khadakwasla Dam) शंभर टक्के भरलं आहे.

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी क्षेत्रातील इतर धरणे टेमघर धरण, वरसगाव धरण आणि पानशेत धरण ही सुद्धा 96 टक्क्यांच्या वर भरली आहेत.

त्यामुळे बुधवारी खडकवासला धरणातून 22809 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात असून, पुण्यात (pune) मुठा नदीला पूर आला. भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने नदीपात्रात लावलेल्या कार अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या.

परंतू, यावेळी मध्यरात्री पुण्यातील एस एम जोशी (joshi bridge) पुलाजवळ थरारक घटना पाहायला मिळाली. पालघरहून पुण्यात आलेले कुटुंबीय मध्यरात्रीनंतर या भागातून जात असताना त्यांची कार पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागली.

या कारमध्ये लहान मुलासह पाच जण होते. या सर्वांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतू, भावा आणि बहीणीने एकमेकांसाठी दिलेली हाक अनेकांचे काळीज चिरणारी आहे.

भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी हा प्रकार घडला आहे.

आणि तात्काळ पोलिसांचा फोन खणाणला. एस एम जोशी पुलाखालील (joshi bridge) नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती मिळाली.

आणि त्यानंतर तात्काळ घटनास्थळी एरऺडवणा पोलीस आणि आग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून या जवानांनी कारमधील पाचही जणांना वाचविले.

दिलासा देणारी बाब म्हणजे ही कार पाणी कमी असल्याने काही अंतरावर जाऊन थांबली होती. अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

यावेळी या गाडीत प्रिया लाल वाणी वय 22, कुणाल लाल वाणी वय 28 आणि कपिल लाल वाणी वय 21 असं या व्यक्तींची नावे आहेत. मात्र, आता ते सुखरूप आहेत.

ही कार पालघरची (palghar) होती, ते रक्षाबंधन असल्याने पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. रजपूत विटभट्टी कडून ते पात्रातील रस्त्याने जात होत. त्यांची कार गरवारे पुलाखाली अडकली होती. आणि हा प्रसंग घडला.

दरम्यान, या घटनेचा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, गाडीत अडकलेल्या व्यक्तींचा जीव वाचविणाऱ्या नागरिकांचा आणि पोलिसांचे सध्या कौतुक होत आहे.