Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मेट्रो कारशेड प्रकरणावर पाच जुलैला सुनावणी

केंद्र व राज्य सरकारमध्ये वादाचा विषय झाला असताना आणि दोन्ही सरकारच्या प्रतिष्ठेचा आणि राजकारणाचा विषय झालेल्या मेट्रो कारशेड प्रकरणावर आता पाच जुलैला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सार्वजनिक हिताचा प्रकल्प

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पासाठी कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर जमिनीच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या वादाविषयी आता मुंबई उच्च न्यायालयात ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

सार्वजनिक हिताचा प्रकल्प असल्याने याप्रश्नी लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती एमएमआरडीएतर्फे ज्येष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुनावणीत केली.

Advertisement

तेव्हा, ‘या महत्त्वाच्या विषयावर प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणी घेण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे ५ जुलै रोजी त्याविषयी निर्णय घेऊ’, असे स्पष्ट करून हा विषय त्यादिवशी सुनावणीस ठेवला.

केंद्र सरकारची याचिका

प्रकल्पाचे नियोजित कारशेड गोरेगावमधील आरे कॉलनीतून कांजूरमार्गमधील १०२ एकर जमिनीवर हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी एक ऑक्टोबर २०२०च्या आदेशाने या जमिनीचे हस्तांतरण एमएमआरडीएला केले; मात्र ही जमीन मिठागराचा भाग असून ती आमच्या मालकीची आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे बेकायदा हस्तांतरण केले, असा दावा करत केंद्र सरकारने याचिका केली आहे, महेशकुमार गरोडिया यांनीही या जमिनीवर हक्क सांगत याचिका केली आहे.

Advertisement
Leave a comment