Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुणे,नगर, सोलापुरात आठ डब्यांच्या मेट्रो !

नागपूरसाठी स्वस्तातील मेट्रो ट्रेन सुरू करत आहोत. त्याच धर्तीवर पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती, लोणावळा जेवढे ब्रॉडगेज आहेत त्यावर आठ डब्यांची मेट्रो चालू शकते.

मेट्रो आठ डब्यांची असून या मेट्रोचा वेग प्रतितास १४० किलोमीटर एवढा असेल.

त्यामध्ये इकॉनॉमी क्लासचे चार डबे, विमानसेवेप्रमाणे दोन बिझनेस क्लासचे डबे असतील. याद्वारे मालवाहतूकही करण्यात येईल.

Advertisement

तसेच स्थानिक बेरोजगारांनाही या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल.

या सेवेमुळे अंतर कमी वेळात पूर्ण करता येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून पश्चिम महाराष्ट्रात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून

Advertisement

रस्त्यांचे जाळे निर्माण करणार असल्याचे कराड येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ५ हजार ९७१ कोटी रुपयांचे ४०३ किलोमीटर लांबीच्याविविध

रस्ते विकास कामांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

पुणे-बंगळुरू हायवे महत्त्वपूर्ण ठरणार

पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम आपल्या सोबत असू, असा विश्वास देत गडकरी म्हणाले,

पुणे-बंगळुरू हा नवा ग्रीन हायवे पुण्याप्रमाणेच या भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई-पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल.

Advertisement

देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढती आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असेल.

Leave a comment