पुणे – महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आगामी काळात दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे लवकरच दुधाच्या (Milk News) टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार असून, दुधाच्या (Milk) दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी गोकुळने म्हशीच्या दूध दरात (Milk News) वाढ केली. नव्या दरांप्रमाणे आता गोकुळकडून म्हशीच्या दूध (Milk News) विक्री दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, अश्यातच आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ (Milk News) केली असून फुल क्रीम दूध आता 63 रुपयांऐवजी 64 रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. मदर डेअरीने दुधाच्या (Milk News) दरात लिटरमागे एक रुपयांनी वाढ केली आहे.

मदर डेअरीने टोकनयुक्त दुधाच्या दरातही दोन रुपयांची वाढ केली आहे. मदर डेअरीने टोकन दुधाच्या दरात प्रतिलिटर 48 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत दरवाढ केली आहे. मदर डेअरीच्या (Milk News) वाढलेल्या किमती आज (सोमवार) पासून लागू केले जाणार आहेत.

दरम्यान, मदर डेअरीने इतक्यात चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ केलीय. 16 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर शहरांमध्ये गायीच्या दुधाच्या दरात (Milk News) प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली करण्यात आली होती.

तर, याआधी मार्च आणि ऑगस्टमध्येही दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवले होते. सध्या दिवसागणित दुधाच्या दरात मोठी वाढ होत असून, सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे.

दरम्यान, मदर डेरी प्रमाणे दीड वर्षांत गोकुळने सहा वेळा दूध दरात वाढ केली आहे. सध्या पुण्यात गोकुळच्या एक लिटर दुधाची किंमत 66 रुपयांवरून 69 रुपये झाली आहे. तर, अर्धा लिटर दुधाची किंमत 33 रुपयांवरून 35 रुपये झाली आहे.