पुणे – दिवाळीला (Diwali Festival) अवघे काही दिवस बाकी राहिले असतानाच पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसणार आहे. दिवाळी सण तोंडावर आलेला असताना अमूलने फुल क्रिम दुधासह (milk) म्हशीच्या दूधात दरवाढ (milk) केली होती. त्यात आता राज्य सहकारी गोकुळने म्हशीच्या दूध दरात वाढ केली आहे. शुक्रवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या दरांप्रमाणे आता गोकुळकडून म्हशीच्या दूध (gokul milk) विक्री दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दूध दरवाढ मुंबई आणि पुणे शहराकरता लागू असेल.

त्यामुळे मुंबई आणि पुण्यात एक लिटर दुधाची किंमत 66 रुपयांवरून 69 रुपये झाली आहे. तर, अर्धा लिटर दुधाची किंमत 33 रुपयांवरून 35 रुपये झाली आहे. यापूर्वी दीड वर्षांत गोकुळने (gokul milk) सहा वेळा दूध दरात वाढ केली आहे.

6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45.50 पैसे इतका खरेदी दर म्हशीच्या दुधाला आधी मिळत होता. तो आता 47.50 झाला असून गायीच्या दूधाचा खरेदी दर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ प्रतिलीटर 32 वरुन 35 रुपये इतका झाला आहे. 21 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत.

दरम्यान, याबाबत बोलताना गोकुळचे (gokul milk) अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की, “रशिया-युक्रेन संघर्ष आणि अनेक दूध उत्पादक देशात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटलं असून, दूध पावडरची मागणी वाढली आहे.

मात्र, सध्या दूध संकलन कमी असल्याने पावडरची मागणी पुरवू शकत नाही. दूध संकलन वाढवण्यासाठी खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.’ असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.