Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मंत्री वर्षा गायकवाडही सायकल रॅलीत

 इंधन दरवाढ आणि घरगुती गॅसच्या दरात वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यभर आंदोलन सप्ताह सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून नव्या मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सहभागी झाल्या होत्या.

आंदोलक ताब्यात, सायकली जप्त

पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे नवी मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे.

येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आज नवी मुंबई महापालिका येथून एक सायकल रॅली काढली. मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत.

मोदी सरकारने केलेल्या भाववाढीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज निषेध नोंदवला. या वेळी नवी मुंबई पोलिसांनी या आंदोलकांना त्याब्यात घेतले असून त्यांच्या सायकलीसुद्धा जप्त केल्या आहेत.

कोकण भवनापर्यंत मोर्चा

महापालिकेमार्फत नागरिकांना युलू या कंपनीकडून भाडेतत्वावर सायकली पुरवल्या जातात. विविध ठिकाणी असणाऱ्या सायकल स्टँडवर या सायकली असतात. या सायकली घेवून नवी मुंबई काँग्रेसने अभिनव रॅली काढून महागाई विरोधात आंदोलन केले.

नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या समोरून सायकली घेवून रॅली काढण्यात आली होती. या आंदोलनात परवानगी फक्त दहा सायकलींसाठी देण्यात आली होती; मात्र आंदोलकांनी अधिक सायकलींचा वापर केला म्हणून पोलिसांनी या सायकली जप्त करण्याची कारवाई केली.

नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोर असणाऱ्या सर्व सायकली पोलिसांनी जप्त करून टेम्पोमधून नेल्या. हा सायकल मोर्चा कोकण भवनपर्यंत नेण्यात आला होता.

 

Leave a comment