पारपत्र मिळवण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावत हिने न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

खटला प्रलंबित नसल्याचे स्पष्टीकरण

कंगनाने पारपत्र नूतनीकरण करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर सुनावणी दरम्यान तिच्या विरोधात न्यायालयात एकही फौजदारी खटला प्रलंबित नाही, असे विधान तिच्या वतीने तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केले आहे.

या विधानाची नोंद न्यायालयाने केली आहे आणि पारपत्र नूतनीकरणबाबत शक्य तितक्या जलदीने निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने पारपत्र विभागाला दिले आहेत.

Advertisement

अख्तर यांच्या तक्रारींची माहिती दडवली

या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्या मार्फत याचिका केली आहे. कंगनाने खोटे, दिशाभूल करणारे आणि स्वतःचा फायदा करण्यासाठी विधान केले आहे.

स्वतः अख्तर यांनी कंगना विरोधात न्यायालयात मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यामुळे कंगनाच्या वकिलांनी केवळ दोन फौजदारी तक्रारींची माहिती न्यायालयात दिली आणि अख्तर यांनी केलेल्या खटल्याची माहिती दडवून ठेवली, असे याचिकेत म्हटले आहे.

अख्तर यांचा मानहानीचा दाखला

कंगनाला या खटल्याची माहिती आहे आणि तिने त्याबद्दल न्यायालयात सांगायला हवे होते, असेही अख्तर यांनी म्हटले आहे. दिंडोशी सत्र न्यायालयात अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Advertisement

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर आरोप केले आहेत. याबाबत हा खटला आहे. यामध्ये कंगनाने हजेरीही लावली आहे

 

Advertisement