मुंबई – साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या ‘लाइगर’ (Liger) चित्रपटाला रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही थिएटरमध्ये (Box Office) सरासरी प्रतिसाद मिळाला. हिंदी भाषेत, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 4.50 कोटी रुपये कमावले, त्यानंतर दोन दिवसांचे ‘लाइगर'(Liger) चे एकूण कलेक्शन 5.75 कोटींवर गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ‘लाइगर’ ची हिंदी आवृत्ती गुरुवारी रात्री उशिरा काही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाली आणि केवळ 1.25 कोटी जमा झाले आहेत.

‘लाइगर’च्या (Liger) हिंदी आवृत्तीचे दोन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने दोन दिवसांत एकूण 5.75 कोटींचा आकडा पार केला.

याशिवाय, ‘Liger’ ने पहिल्या दिवशी जगभरातील सर्व भाषांमध्ये 33.12 कोटी रुपयांची कमाई केली. सुपरस्टार विजय देवरकोंडा ‘लाइगर’मध्ये बॉक्सरची भूमिका साकारत आहे, तर अनन्या त्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली.

या चित्रपटात रम्या विजयच्या आईची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीमने संपूर्ण भारतात ‘लाइगर’चे दमदार प्रमोशन केले.

दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या ‘लाइगर’ या चित्रपटाला लोक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसननेही चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे.