महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला येईल.

मनसेच्या प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा पथकात समावेश असेल. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली.

कसे असेल आपत्ती व्यवस्थापन पथक ?

मनसेने पुण्यात राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले. या आपत्ती व्यवस्थापन पथकात 50 मुला-मुलींचा समावेश असेल.

Advertisement

शहरातील पूरस्थिती, इमारत दुर्घटना यासारख्या संकटांच्या वेळी मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन पथकातील मुला-मुलींना मनसे प्रशिक्षण देणार आहे. पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी प्रशिक्षित पुरुष आणि महिला यांचा पथकात समावेश असेल.

पुणे शहरात सतत नैसर्गिक आपत्ती कोसळत असते. त्यासाठी 50 जणांचे प्रशिक्षित मनसे रेस्क्यू पथक कार्यरत असेल.

Advertisement

राज ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरू आहे.

दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.

 

Advertisement