ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मनसेने ४५ जागा निवडून आणण्याचा केला निर्धार

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.

पूर्ण ताकदीनं उतरणार

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र पुणे महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार का? असं विचारलं जात असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिशन 90 आखण्यात आल्याचं समजतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुणे महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं निश्चित करण्यात आलं.

मनसेची सध्याची ताकद

पुण्यात 2007 मध्ये मनसेचे आठ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2012 मध्ये मनसेनं चांगलीच भरारी मारली. तब्बल 29 नगरसेवकांसह पुणे महापालिकेत मनसे एक ताकदवर पक्ष बनला; मात्र पुढे मनसेची ताकद क्षीण झाली.

सध्या पुणे महापालिकेत मनसेचे दोन नगरसेवक आहेत. असं असलं तरी 2022 म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व ताकदीने उतरणार आहे.

45 जागा निवडून येणारच

प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात; मात्र शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी पक्ष बांधणी आवश्यक आहे. अशावेळी राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे.

कार्यकारिणीत बदल

राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार पुण्यातील कार्यकारिणीतील पदांमध्ये बदल केला जाणार आहे. प्रभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदं रद्द करून शाखाध्यक्ष आणि शाखा उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

तसंच निवडणूक प्रचारात मनसेचं मुख्य टार्गेट हे सत्ताधारी भाजप असणार आहे.

You might also like
2 li