पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS Pune) पुण्यातुन (Pune) अजून एक धक्का बसला आहे. कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणेच्या पत्नीने मनसेला रामराम करत राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश केला आहे.

जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आणि रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पक्षात प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.

जयश्री मारणे या मनसेच्या माजी नगरसेविका होत्या. तसेच त्या २०१२ साली मनसेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. २०१७ मध्येही त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा त्या पराभूत झाल्या होत्या.

Advertisement

मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मनसेला पुण्यातून गळती लागल्याचे दिसून येत आहे. कारण याआधीही रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांनी मनसेतून रामराम घेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

जयश्री मारणे या गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे, त्याची पत्नी आहे. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात २४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच गजाला मोक्का गुन्ह्याअंतर्गत २०१४ पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. आणि त्यांनतर तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झाली होती.

Advertisement