मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आगामी काळात महापालिकांच्या निवडणूका (Muncipal corporation election) होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शिवतीर्थावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. यातच मनसेकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी स्वतः राज ठाकरे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही बैठक महत्वाची मनाली जात आहे. मनसेकडून विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. याचीच घोषणा राज ठाकरे या बैठकीत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

पुणे महापालिका निवडणुक जवळ येत असल्याने पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ (Shivtitrth) निवास्थानी आयोजित करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्मण सेने या पक्षाने मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या ४ महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. मनसेच्या आजच्या बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.

बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आजच्या शिवतीर्थावरील बैठकीला असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement