Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

दरोडेखोरात मनसेचा उपाध्यक्षही

पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोहीम उघडली असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांत मनसेच्या उपाध्यक्षांचाही समावेश आहे.

ही आहेत गजाआड झालेल्यांची नावे

पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केली.

पोलिसांनी या टोळीकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी असा 1 लाख 15 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी दत्ता गायकवाड (वय 23), गौरव परजणे (वय 20), किशोर जाधव (वय 22), दत्ता व्यवहारे (वय 37, सर्व रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांचा साथीदार अजय माकर (वय 25) फरार झाला आहे. यामधील दत्ता व्यवहारे हा मनसेच्या सहकार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांना गुप्त माहिती

गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना पोलिस शिपाई ऋषिकेश व्यवहारे व ऋषिकेश ताकवणे यांना एक गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार लोणीकंद ते बकोरी रस्त्यावर खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले.

गावठी कट्टा, सुरी, मिरचीपूड जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपींकडून गावठी कट्टा, सुरी, मिरचीपूड असा दरोडा टाकण्यासाठी लागणारा ऐवज जप्त केला.

 

Leave a comment