Breaking News Updates of Pune

देशातील मोबाईल विक्री लवकरच वाढणार !

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील मोबाईल उत्पादक कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मोबाईल वापर वाढल्यामुळे दोन प्रकारच्या समस्या सध्या दिसून येत आहेत.

त्यात एक म्हणजे नवीन बाजारात विक्रीसाठी सादर करण्याची आणि सुमारे अडीच कोटी मोबाईल हे सेवा केंद्र बंद असल्याने दुरुस्त होण्याची वाट पाहत आहेत. अशा या दोन प्रकारच्या समस्या लक्षात घेता मोबाईल खराब झाले आहेत, ज्यांना सेवा केंद्रांमध्ये नेण्याची गरज आहे, अशा मोबाईलच्या संख्येतही साधारण वाढ होऊन ती ४ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

अत्यावश्यक क्षेत्रात खास करून काम करणारे जे लोक आहेत, त्यांचे मोबाईल बंद पडल्याने मोठा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. तसेच नवीन मोबाईल घेण्याची योजना ज्यांच्या डोक्यात आहे, त्यांनाही आता लॉकडाऊनमुळे काही नवीन मोबाईल विकत घेता येणे अशक्य झाले आहे.

आता या मोबाईल खरेदी करणाऱ्यांना लॉकडाऊननंतर कोणत्या मोबाईल कंपन्या कशाप्रकारे आकर्षित करतील ते पाहायचे आहे. लॉकडाऊननंतर मोबाईल फोनची बाजारपेठ पुन्हा एकदा नशीब अजमावणार आहे.

त्यासाठी कंपन्या आतापासून जोरदारपणे मोबाईल फोनची विक्री करण्याची तयारी करत आहेत, ज्यामुळे बरीच सवलत आणि ऑफर्स अपेक्षित आहेत.

ग्राहकांना एक्स्चेंज, कॅशबॅक आणि विनामूल्य विमा ऑफरदेखील मिळतील. सध्या कंपन्यांचे लक्ष ऑनलाइन विक्री आणि २४ तासांच्या वितरणावर असेल. लॉकडाऊनमुळे विक्री ५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यताही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.