पुणे : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Union Home Minister and Co-operation Minister Amit Shah) यांचा पुणे (Pune) दौरा सुरु आहे.

या दौऱ्यामध्ये अमित शहांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. रविवारी अमित शहांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा (Gathering of BJP workers) पार पडला.

यावेळी भाजपचे आमदार गिरीश बापट (MLA Girish Bapat) बोलत होते. पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची (BJP) सहा ते सात लाखाची वोट बँक (Vote bank) आहे.

Advertisement

ती वोट बँक दहा लाखांवर गेल्यावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहांना (Amit Shah) आनंद होईल असे गिरीश बापट म्हणाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. असे आव्हानही बापट यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

आगामी काळात भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दहा नवीन लाभार्थी मिळवायचे आहेत आणि वोट बँक वाढवायची आहे. एक लक्षात ठेवा झेंडे लावून, बॅनर लावून, पेपरला फोटो देऊन वाढणार नाही.

तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा लाभार्थी व्यक्तीच्या घरी जाईल तेव्हाच हे वोट बँक वाढेल. असे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार गिरीश बापट म्हणाले.

Advertisement

नागरिकांना सांगण्यासाठी भाजपच्या खूप साऱ्या योजना आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने १० नवीन मिळवले तर या वोट बँकमध्ये आणखी भर पडेल असेही बापट म्हणाले.