पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत भाषण केले. या भाषणावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार मधील नेत्यांनी टीका केली आहे. या टीकांना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रियाताई सुळे, (Supriya Sule) नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळले आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

नरेंद्र मोदींच एवढेच म्हणणे आहे की, कोरोनाच्या आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असे सांगण्याचा जो प्रयत्न झाला.

Advertisement

त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झालीआणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला. महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषय नाही.

महाराष्ट्रच (Maharashtra) नाही संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले. महाराष्ट्र शासनाने काय दिल याची श्वेतपत्रिका जाहीर करा असेही पाटील म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, सुप्रियाताई किती ही केविलवाणी धडपड केली. बाळासाहेब थोरात तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना चांगले माहीत आहे.

Advertisement

फिल्डवर भाजपचे कार्यकर्ते होते. योजना केंद्राच्या होत्या तुम्ही काय दिल? लॉकडाऊन मध्ये झालेले आर्थिक नुकसान हे मोदींनी भरून काढले. रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची.

लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता. आम्ही तुमची काळजी घेऊ, आम्ही तुमचे पोट भरू हा आत्मविश्वास तुम्ही परप्रांतीय लोकांना देऊ शकला नाही हे तुमचे अपयश आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मला आश्चर्य वाटले तुमच्या बोलण्यात राऊत (Sanjay Raut) अजून कसे आले नाहीत, राऊत आलेच पाहिजेत त्याच्याशिवाय आपला इंटरव्ह्यू संपत नाही त्यामुळे नमस्कार, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी होत असलेला संवाद थांबवला.

Advertisement

शरद पवारांचे (sharad Pawar) कौतुक केले त्याबाबदालाही विचारण्यात आले. तो मोदींच्या मनाचा मोठेपण आहे. त्यांच्याकडून काही तरी शिका मोदी आपला विरोधक जरी असला दुष्मन जरी असला तरी त्याच्याबद्दल जे चांगल आहे त्याच कौतुक करतात.

तुम्हाला चांगल्याच कौतुक करता येत नाही त्यामुळे मोदींकडून काही शिका, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिला आहे.

Advertisement