महागाईची जबाबदारी केंद्र सरकारची असते. सध्या महागाई वाढत असताना केंद्र सरकारविरोधात नाराजी वाढत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी महागाईत असमंससपणाचे तेल ओतण्याचे काम केले आहे.

मोदी विश्वगुरू बनण्यासाठीच

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे.

यामुळेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून विरोधकांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे.

Advertisement

याच दरम्यान भाजपच्या एका प्रवक्त्यांनी मात्र या दरवाढीवर अजब विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नव्हे, तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचं म्हटलं आहे.

मोदींना इतिहास लक्षात ठेवेल

दिल्ली भाजप प्रवक्त्या सारिका जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे, तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले.

Advertisement

तसेच सारिका यांनी मोदी यांनी तिहेरी तलाक, कलम 370 रद्द करून अयोध्येत राम मंदिर तयार करण्यास सुरुवात करून असे काम केले आहे, ज्यासाठी इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल असंदेखील म्हटलं आहे.

मोदी कशासाठी ?

सारिका जैन मोदी लाखो खेड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि मुस्लिम बहिणींना तिहेरी तलाकातून मुक्त करण्यासाठी आले आहेत” असं आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

मोदी हे आपल्या सात वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील ब-याच भागात 35 विमानतळे बांधण्यासाठी, अनेक एम्स रुग्णालये बांधण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी, प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी, प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आले आहेत” असं देखील जैन यांनी म्हटलं आहे.

Advertisement