नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या घरासमोर काँग्रेस (Congress) कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी येत होते. त्याआधीच भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची अडवणूक केली आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या घराच्या दिशेने येताच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. व त्यांनी काँग्रेसविरोधात नाना पटोले (Nana Patole) मुर्दाबाद अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अडवणूक करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आधीपासूनच तयारीत होते. त्यामुळे ते याठिकाणी आधी पोहोचले आहेत. दरम्यान या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांना (Police) चांगलीच कसरत करावी लागत आहे.

Advertisement

पोलिसांकडून सकाळपासूनच मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस असा हा संघर्ष दिसून येत आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते तुलनेत कमी असून त्यांनी घोषणाबाजीही फारसी केली नाही. मात्र, झेंडे घेऊन ते गडकरी यांच्या घराच्या दिशेने येत आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राने (Maharashatra) देशात कोरोना पसरविल्याचा आरोप केला होता.

Advertisement

त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi )कडून या विधानावर टीका करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राने कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविले. त्यामुळे देशात कोरोना पसरला, असा आरोप मोदी यांनी संसदेत केला होता.

त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काल काँग्रेसकडून संविधान चौकात आंदोलन करण्यात आले होते. यामुळे मोदींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Advertisement