पुणे – भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या ट्विटमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या राज्यात ईडी जोरदार अॅक्टिव्ह आहे. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय (sanjay raut) राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण?

याचं उत्तर भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिलंय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख (Anil Deshmukh), नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे.

लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!” या आशयाचे ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

दरम्यान, आता भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या या ट्विटला राष्ट्रवादी कडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांनी मोहित कंबोज यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

“मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा परप्रांतीय असून तो आमच्या राज्यात येऊन सातत्याने विरोधकांना धमक्या देत आहे. पण आम्ही लक्ष देत नाही.

कारण असे फालतू मोहित कंबोज वारंवार भुंकताना दिसत आहेत”. अशी टीका रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांनी केली आहे.

रूपाली ठोंबरे पाटील नेमक्या काय? म्हणल्या….

भाजपाचे नेत्यांनी हा जो पोरखेळ लावला आहे तो बंद करावा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, भाजपाचा कुठलाही नेता उठतो आणि म्हणतो, हा नेता आत जाणार, याच्यावर कारवाई होणार.

याला कोणताही कायदेशीर थारा नाही. भाजपाच्या नेत्यांकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करून ज्याला क्लिनचीट दिली असेल,

तुमच्या काळात दिली गेली असेल तरी पुन्हा चौकशी करायला लावणे हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ तुम्ही थांबवणार आहात का?’ असा सवाल रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.