पुण्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट 3.9 वर आलेला आहे. ”दुकानांची वेळ 5 ऐवजी 7 पर्यंत करावा आशा सूचना आलेल्या आहेत,” त्यावर सोमवारी निर्णय होईल. सकारात्मक विचार होईल.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्यांना बाहेर पडता येईल का? याबाबतीत विचार सुरू आहे. इतरांना डोस घेण्याबाबत प्रेरणा मिळेल” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
यांच्या उपस्थितीत बैठक
पुणे विधानभवनाच्या सभागृहात पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.’त्या वेळी पवार बोलत होते.
विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ नीलम गोऱ्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार शरद रणपिसे, आमदार राहुल कुल, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. दिलीप कदम आदी मान्यवरांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तिसरी लाट लक्षात घेऊन सज्ज राहा
”कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी,” असे निर्देश पवार यांनी आज दिले.
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
90 हजार लोक स्थलांतरित
”सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होऊन दरड कोसळत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे.
नऊ जिल्हे पूर बाधित असून एकूण ७६ जणांचा मृत्यू या पावसाने झाले आहेत. ५९ लोक बेपत्ता आहेत, 38 जखमी झाले आहेत.
कोल्हापूर -पुणे जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढीचा फटका असल्याचं सध्या तज्ञाच मत आहे.
संपूर्ण राज्यात 90 हजार लोकांना स्थलांतरीत केले आहे, राज्यात एनडीआरएफची 21 पथके कार्यान्वित आहे, ” अशी माहिती त्यांनी दिली.
आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी.
व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधीक गतीमान करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
लसीकरणामध्ये 55 लाखाचा टप्पा पार
पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक असल्याचे सांगून पवार म्हणाले, ”पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखाचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब आहे, एका दिवसात एक लाखाहून अधीक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे; मात्र लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.