मुंबई – सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. आज विधानसभेतविरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai Pune Express Highway) अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने योग्य चौकशी करावी आणि सरकार यावर काय उपाययोजना करणार असा सवाल अजित पवार (ajit pawar) यांनी उपस्थित केला.

अजित पवार नेमकं काय? म्हणाले…

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी विधानसभेत लक्षवेधी चर्चेदरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातांचा मुद्दा मांडत हा मार्ग आठपदरी करण्याची मागणी केली.

राज्यात सर्वाधिक ट्रॅफिकची अडचण ही मुंबई-पुणे मार्गावर (Mumbai Pune Express Highway) होत असते. त्याठिकाणी मोठ्या वाहनांमुळे होणारे अपघात लक्षणीय आहेत.

मोठे कंटेनर शिस्त न पाळता गाडी चालवतात, त्यामुळे लहान गाड्यांच्या अपघातात वाढ झाली आहे. याचे उदाहरण आपण विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्याबाबतीत बघितल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

त्यामुळे आठपदरी रस्ता झाल्यास त्यातील दोन लेन मोठ्या गाड्यांसाठी ठेवल्यास या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

तसेच विनायक मेटे यांच्या अपघाताबद्दल त्यांच्या कुटुंबियांमध्ये व त्रयस्थ लोकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून यात काही ढिलेपणा झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे असे झाले असल्यास शासनस्तरावर काही करावाई केली जाईल का? असा प्रश्न त्यांनी विचारला. अशी परिस्थिती राज्यातील कोणत्याही व्यक्तीवर येऊ नये,

यासाठी सरकारने तातडीने खबरदारी घेऊन निर्णय घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी यावेळी केली.