मुंबई – शिंदेगटाच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत आलंय. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिलं अधिवेशन (Monsoon Session) होतं. त्यामुळे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होतं. पण विरोधकांच्या या निषेधात भर पडली ती क्रिएटिव्ह घोषणाबाजीची.., या घोषणाबाजीमुळे विरोधकांचा आवाज मोजक्या अन् ठोस शब्दात सरकारसह जनतेपर्यंत पोहोचला असल्याचं पाहायला मिळत आहे.

30 जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा शपथविधी पार पडला होता. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

नुकतंच या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम देखील पार पडला असून, शिंदे गटाकडून नऊ तर भाजपाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, आज (दि. 17) विधिमंडळ अधिवेशन (Monsoon Session) होतंय. हे अधिवेशन किती वादळी ठरणार याची पहिली झलक अधिवेशनाआधी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीतून दिसून आली.

विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. “50 खोके एकदम ओके!’ , “रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!’ अश्या घोषणा देण्यात आल्या.

या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन गेला होता. तर दुसरीकडे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका केली आहे.

“हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली.

सोबतच आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही.

आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?” असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तर “आले रे आले गद्दार आले..’ असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यात आघाडीवर होते.