पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध शासकीय विभागातील तब्बल ४ हजार ३६८ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारातून ही माहिती प्रशासन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. परिणामी दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला. त्यामध्ये अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच दर महिन्याला किमान ५० अधिकारी व कर्मचारी निवृत्त व स्वेच्छानिवृत्त होतात. महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने नागरी सुविधा पुरविताना प्रशासनावर ताण येत आहे. तब्बल ४ हजार ३६८ इतकी पदे व नव्याने निर्माण झालेली पदे रिक्त आहेत. सध्या उपलब्ध मनुष्यबळावर कामकाज सुरू असून अनेकांवर अतिरिक्त पदभार सोपविली आहेत. महापालिका प्रशासन विभागाकडे १ सप्‍टेंबर २२ रोजी माहिती अधिकाराचा अर्ज सादर करत महापालिकेतील आकृतिबंधाच्या मंजुरीनुसार विविध विभागातील अ, ब, क आणि ड’ या श्रेणीतील मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती मागितली होती. प्रशासन विभागाने ”अ, ब, क आणि ड” या श्रेणीतील ता. ३१ मार्च २०२२ अखेर पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील अ, ब, क आणि ड या श्रेणीत एकूण ३५६ संवर्ग आहेत. यात मंजूर पदांची संख्या ११ हजार ५१३ आहे. त्यापैकी ७ हजार १२४ पदे भरली आहेत.

पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स

पद संख्या – 45 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा:

स्त्रीरोगतज्ज्ञ – 70 वर्षे

बालरोगतज्ञ – 70 वर्षे

भूलतज्ज्ञ – 70 वर्षे

वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

स्टाफ नर्स:

खुला प्रवर्ग – 38 वर्षे

राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज शुल्क – रु. 150/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

Educational Qualification For PCMC Recruitment 2022

पदाचे नाव                                     शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोगतज्ज्ञ                         MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO MCI/ MMC Registration
बालरोगतज्ञ                          MD/DNB Pediatric/ DCH MCI/ MMC Registration
भूलतज्ज्ञ                              MD Anestesia/ DA/ DNB MCI/ MMC Registration
वैद्यकीय अधिकारी              MBBS/ MCI/ MMC Council Registration
स्टाफ नर्स                           GNM/ B.Sc Nursing MNC Registration

Salary Details For Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

पदाचे नाव                         वेतनश्रेणी
स्त्रीरोगतज्ज्ञ                      Rs. 75,000/-
बालरोगतज्ञ                       Rs. 75,000/-
भूलतज्ज्ञ                           Rs. 75,000/-
वैद्यकीय अधिकारी            Rs. 60,000/-
स्टाफ नर्स                         Rs. 20,000/-

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2022 – Important Documents

1.वयाचा पुरावा

2.पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)

3.शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका

4.रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)

5.शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

6.निवासी पुरावा

7.जातीचे प्रमाणपत्र

8.उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो

How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.

तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला पदाचे नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक लिहावे.

सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.ddhspune.com PCMC Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3fYOUMg

👉 ऑनलाईन अर्ज करा
www.ddhspune.com

✅ अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in