ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

दहावीच्या निकालासाठी आणखी प्रतीक्षा

दहावीचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत होती; परंतु ही डेडलाईन पाळली गेली नाही.

त्याचे कारण शाळा आणि मुख्याध्यापकांकडून निकालपत्राच्या माहिती भरण्यात त्रुटी राहिल्या आहेत. आता हा निकाल आठवडाभरात जाहीर केला जाईल अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.

संगणकात माहिती भरण्यात चुका

दहावीच्या गुण भरण्याची मुदत संपून दहा दिवस झाले असले, तरी शाळांकडून गुण भरण्यात चुका झाल्याने निकाल आणखी आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शाळा आणि शिक्षकांकडून संगणकीय प्रणालीत मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दहा जूनपासून माहिती भरण्यास सुरुवात

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुण आणि मूल्यमापनासंदर्भात दहा जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली होती.

राज्य शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन संदर्भात दिलेल्या कार्यपद्धतीत विविध प्रकारची माहिती आणि दस्तावेज गोळा करण्यासाठी नियमावली देण्यात आली होती.

आठवडाभरात निकाल

या नियमावलीत माहिती भरण्यासाठी शिक्षकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्याने निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होऊ शकला नाही.

आता हा निर्णय लांबणीवर पडला असून आठवडाभरात हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल लांबणीवर पडला असल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

 

You might also like
2 li