मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (mouni roy) ही एक भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. मौनीने (mouni roy) ‘नागिन’ आणि ‘देवों के देव महादेव’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मौनी रॉयचा (mouni roy) जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे एका बंगाली कुटुंबात झाला.

मौनीने (mouni roy) आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले आणि त्यानंतर तिने जामिया मिलिया इस्लामिया येथून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले.

मौनीने तिचे शिक्षण अर्धवट सोडले आणि अभिनय आणि चित्रपट जगतात आपले नशीब आज मावण्यासाठी मुंबई गाठली. मौनी रॉयने 2007 मध्ये एकता कपूरच्या टीव्ही शो ‘क्यांती सास भी कभी बहू थी’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

या शोमध्ये ती पुलकित सम्राट सोबत दिसली होती. मौनीने (mouni roy) तिच्या 11 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. आज मौनी टीव्हीच्या दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि आता ती चित्रपटांमध्ये दिसत आहे.

2018 हे वर्ष मौनी रॉयसाठी खूप लकी मानले जात आहे, कारण त्याच वर्षी ती ‘गोल्ड’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसली होती. या चित्रपटात ती अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

या चित्रपटाशिवाय मौनीने ‘तुम बिन 2’ मध्‍ये आयटम सॉन्‍ग, ‘KGF’मध्‍ये आयटम सॉन्ग आणि अनेक म्युझिक व्हिडिओमध्‍ये काम केले आहे.

अलीकडेच मौनी रॉय (mouni roy) अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते.

मौनी रॉयला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज जास्त आहेत. अभिनेत्रीकडे 1.5 कोटी रुपयांची मर्सिडीज जीएलएस 350 डी आणि 67 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ ई क्लास देखील आहे.