Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

वारक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन

पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर विश्व हिंदू परिषद शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा परिषदेचे महाराष्ट्र गोव्याचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी दिला आहे.

उपासनेच्या मूलभूत अधिकारावर गदा

देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरू आहेत.

त्यात विनामास्क फिरणा-या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत.

Advertisement

असे असताना वारक-यांच्या उपासनेच्या या मूलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येत आहे, असा सवाल त्यांनी केला.

वारक-यांच्या मागण्या

महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे. कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने फक्त शिस्तप्रिय वारक-यांवर का लादली जात आहेत?

असा सवाल उपस्थित करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. प्रत्यक्षात वारीबाबत वारक-यांच्या माफक मागण्या आहेत. प्रत्येक दिंडीतील किमान २ वारक-यांना (विणेकरी सह टाळकरी) यांना वारी करू द्यावी.

Advertisement

मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ४० ते ५० वारक-यांना वारी करण्याची परवानगी द्यावी. आरटीपीसीआर तपासणी करून प्रवेश द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

शनिवारी आंदोलन

शनिवार १७ जुलैला रोजी जिल्हाधिकारी, शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. लाक्षणिक उपोषण, आंदोलन, कीर्तन-भजन असा साखळी पद्धतीने कार्यक्रम होणार आहे.

लवकरात लवकर सरकारने वारक-यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

Advertisement
Leave a comment