Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कोरोनामुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली

मुंबई : गेल्या सव्वा वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी सुरू आहे.

कृतीयुक्त गावांचा विचार करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक झाली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोनामुक्त असलेले व भविष्यातही कोरोनामुक्त राहू अशी केवळ ग्वाही देणारी नव्हे, तर त्यानुसार कृती करणाऱ्या गावांचा या बाबत विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

मूल्याकंनाचा तुलनात्मक प्रस्ताव

बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्याकंन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने दहावीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली, त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा. त्यानुसार अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा खर्च सरकार करणार

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याची योजना प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Advertisement

हिवरे बाजार पॅटर्न

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या नेतृत्वात हिवरे बाजार (जि. अहमदनगर) येथे शाळा सुरू झाली आहे. गाव कोरोनामुक्त असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्या धर्तीवर राज्यात आता चाचपणी केली जाईल.

Leave a comment