पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी मतदारांना दिलेला शब्द पाळल्याचे चित्र दिसत आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये (Bullock cart race) अमोल कोल्हे स्वतः घोडीवर स्वार झालेले पाहायला मिळाले आहेत.

आंबेगाव (Ambegav) तालुक्यातील लांडेवाडी (Lamdewadi) व मावळमध्ये (Maval) बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या.

त्यानंतर निमगावच्या यात्रेतही बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या. याच बैलगाडा शर्यतीमध्ये अमोल कोल्हे यांनी घाटात घोडी धरत दिलेला शब्द पाळला आहे.

Advertisement

या शर्यतीमध्ये ३५० बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. तसेच शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirav Adhalrav Patil) यांच्या आव्हानाला खासदार अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, जिल्ह्यात पहिली शर्यत झाली, तेव्हा संसदेतअधिवेशन सुरु होत. ज्यांची संसदेतील उपस्थितीच ५०- ५५ टक्के आहे. १५ वर्षाच्या कालावधीत ज्यांना आपल्या भाषणातून एकदाही छाप पाडता आली नाही.

अश्या लोकांच्या आक्षेपाला उत्तर देणे मला स्वागर्ताह वाटत नाही. बसायचं असत तर तिकडेही बसू शकलो असतो. पण तिकडे बसलो असतो तर त्यांना जास्त त्रास झाला असता.

Advertisement

अन वयोमानापरत्वे त्यांना त्रास होऊ नये अशी माझी इच्छा होती असे अमोल कोल्हे यांनी आढळरावांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. शर्यत सुरु झाली ही खरचं खूप आनंदाची गोष्ट आहे.

यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे, महाविकास आघाडी सरकारचे मी मनापासून आभार मानतो. यामुळे बैल बाजारातील बैलाची खरेदी विक्री सुरु झाली.

यामुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर बैलगाडा शर्यतीला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. असेही अमोल कोल्हे म्हणाले आहे.

Advertisement