ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

खासदार संजय राऊत यांची घटक पक्षांना साद; पुण्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा

राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काहीही हातातून सोडू नका, असं ते म्हणाले.

महापौरांना टोला

म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीचे उद्‌घाटन राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या वेळी राऊत यांनी पुणे महापालिकेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायला हवा, असा आदेशच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

राज्यात महाविकास आघाडी आहे. मग महापालिकेवरही महाविकास आघाडी आणायला हवी, असं संजय राऊत म्हणाले. या वेळी त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही टोला लगावला.

मी पुन्हा येईन, येत राहीनं

राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या वक्तव्याचा आधार घेतला. त्या वेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. मी पुन्हा येईल.

मी दिल्लीत असलो, तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईन, असं राऊत म्हणाले. त्या वेळी उपस्थित लोक खळखळून हसत होते.

महापौरांचं राज्य

राऊत कार्यक्रमाला पोहोचले आणि बोलायला उभे राहिले, तोपर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमस्थळी आले नाही. त्या वेळी राऊत यांनी महापौरांना टोला लगावला. महापौर अजून आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय.

महापौरांनी सगळीकडे जायला हवं. महापौरांना वाटतं, की राज्य आपल्या हातात आलं आहे. ते त्यांना सोडायचं नाही, अशा शब्दांत राऊत यांनी मोहोळ यांना टोला हाणला.

80 जागांवर लढण्याचा पुनरुच्चार

पुण्यात आम्ही महाविकास आघाडी बनवू, याबाबत वाटाघाटी करू. एकत्र बसून चर्चा करू. महाविकास आघाडीत आम्ही 80 जागा लढवू शकत नाही का? असा, सवाल राऊत यांनी केला.

यापूर्वीही राऊत यांनी आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र लढवली, तरी शिवसेना 80 जागांवर लढेल, असं सांगितलं होतं.

पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

 

You might also like
2 li