ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

खा. सुप्रिया सुळे यांना महापाैरांचा टोला

पुणे शहरातील कचरा प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी कचरा प्रक्रिया उद्योगातील गैरव्यवहाराची ईडी, सीबीआय चाैकशी करण्याची मागणी केली, त्यावरून महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी खा. सुळे यांना टोला लगावला.

ईडी व सीबीआयवर खा. सुळे यांचा विश्वास असेल, तर तोच अनिल देशमुख यांच्याबाबतीतही दाखवा, असा सल्ला दिला.

सुळे यांनी केली होती ईडी चाैकशीची मागणी

पुणे शहरातील कचरा प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी कचऱ्याबाबत झालेल्या खर्चाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. सुळे यांच्या या मागणीवर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले महापाैर ?

‘सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. पुणे महापालिका निवडणुका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ईडीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

सुप्रियाताईंनी ईडीमार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो.

देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ईडी चौकशी बाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा,’ असा टोला मोहोळ यांनी लगावला आहे.

पवारच नेतृत्व करत असल्याचं सांगून पकडलं कात्रीत !

कचरा प्रश्नावरून भाजपवर टीका करणाऱ्या सुळे यांना कात्रीत पकडत मोहोळ यांनी वेगळाच सवाल केला आहे. ‘सुप्रियाताई यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे.

२०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे, तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?’ असा सवाल मोहोळ यांनी केला आहे.

You might also like
2 li