लोकसभेत प्रश्न विचारण्यात महाराष्ट्राचे खासदार अव्वल राहिले आहेत. त्यातही खासदारांच्या कामगिरीचा पक्षनिहाय विचार करता भाजपच्या खासदारांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत, तर त्या खालोखाल शिवसेना खासदार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

वैयक्तिक कामगिरीचा विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा आपल्या कामगिरीचा झेंडा उंचच ठेवला आहे.

सोलापूरच्या खासदाराच्या नीचांकी प्रश्न

भाजपच्या खासदारांनी ४५ टक्के तर शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत ३७ टक्के प्रश्न विचारले आहेत. लोकसभेत एकूण विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासदारांचे प्रश्न विचारण्याचे प्रमाण २९ टक्के आहे.

Advertisement

महिला खासदार म्हणूनही सुळे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर सर्वांत कमी प्रश्न विचारण्याची नामुष्की भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वार महास्वामी यांच्या नावावर आहे.

२५ टक्क्यांहून अधिक प्रश्न महाराष्ट्रातील खासदारांचे

लोकसभा निवडणूक २०१९ पासून २०२१ पर्यंत संसदेची एकूण पाच अधिवेशने झाली. त्यात कोरोना महामारीमुळे लोकसभेच्या कामकाजावर बऱ्याच मर्यादा आल्या. जेवढी अधिवेशने झाली आणि कामकाज झाले, त्यात आतापर्यंत २३ हजार ९७९ प्रश्न विचारण्यात आले.

त्यातील सहा हजार ९४४ प्रश्न हे महाराष्ट्रातील खासदारांनी विचारले आहेत. महाराष्ट्रात ४८ पैकी सात महिला खासदार आहेत. उर्वरीत पुरुष खासदार आहेत. महिला खासदारांनी ९९८ प्रश्न विचारले आहेत.

Advertisement

सर्वाधिक प्रश्न विचारणारे पहिले पाच खासदार

 • सुप्रिया सुळे (बारामती- राष्ट्रवादी) -३१३
 • डॉ. सुभाष भामरे (धुळे- भाजप) – ३०६
 • डॉ. अमोल कोल्हे (शिरुर- राष्ट्रवादी) – ३०६
 • श्रीरंग बारणे (मावळ- शिवसेना) – २९८
 • गजानन कीर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई – शिवसेना) -२९०

महिलांची खासदारांची कामगिरी

 • सुप्रिया सुळे – ३१३
 • डॉ. हीना गावित – २४०
 • प्रीतम मुंडे -१५७
 • पूनम महाजन -१३०
 • भारती पवार -१०९
 • नवनीत राणा – २८
 • भावना गवळी – २१

सर्वात कमी प्रश्न विचारणारे खासदार

 • डॉ. जयसिद्देश्वार महास्वामी (सोलापूर – भाजप) -२०
 • डॉ.भावना गवळी (यवतमाळ- शिवसेना) – २१
 • नवनीत राणा (अमरावती – अपक्ष ) – २८