पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याच्या लोकवस्तीमध्ये रानगवा (Rangava) घुसला होता. रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाची (Forest Department) आणि पोलिसांची टीम (Police team) घटना स्थळी दाखल झाली होती.

शवविच्छेदन अहवालातून रानगव्याचा हृदयविकाराच्या (Heart disease) झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते होते त्यामुळे मुंबई उच्चन्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली होती.

रानगव्याचा मृत्यू कशामुळे झाला? त्याला जबाबदार कोण? याची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका (Petition) दखल करण्यात आली होती.

Advertisement

रानगव्याला पकडत असताना त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. याचीच दखल मुंबई उच्चन्यायालयाने घेतली आहे. वन खात्याला आणि पोलीस खात्याला (police department) याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे.

‘लॉयर्स फॉर अर्थ जस्टीस ’ या वकिलांच्या टीमने अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत डिसेंबर 2020 मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती याचिका आज सुनावणीसाठी पुढे आली.

न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि वन विभाग व पोलीस आयुक्तांना (Commissioner of Police) ​नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Advertisement

खंडपीठाने याचिकेतील मुद्द्यांची दखल घेतली असून याचिकेवर आपली बाजू मांडण्याचे निर्देश देत महाराष्ट्र वन विभाग आणि पुणे पोलीस आयुक्तांना नोटीसा पाठवल्या आहेत.