ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अनधिकृत कंत्राटदारावर मुंबई पालिकेची मेहेरनजर

मुंबई : कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यापूर्वी कंत्राटदाराची आर्थिक क्षमता, व्यावसायिक उलाढाल, त्याने अन्यत्र केलेली कामे यांची तपासणी केली जाते;

मात्र मुंबई महापालिकेने सफाई कामगारांच्या घरांच्या पुनर्विकास योजनेत कंत्राट दिलेल्या शायोना कॉर्पोरेशनकडून अशी कोणतीही पूर्व माहिती न घेताच कंत्राट देण्याचा घाट घातला आहे.

ठाणे महापालिकेत 110 कोटी रुपयांची कामे करणा-या या कंत्राटदाराला पालिकेने तब्बल 1700 कोटी रुपयाची कामे दिली आहेत.

अगोदर कामे नंतर नोंदणीसाठी मुदतवाढ

राजकीय वरदहस्त असला की, नियम धाब्यावर बसून कंत्राट मिळवता येते. मुंबई महापालिकेने सफाई कामगारांच्या घरांच्या पुनर्विकास योजनेत कंत्राट दिलेल्या शायोना कॉर्पोरेशन मुंबई महापालिकेत नोंदणीकृत कंत्राटदार नाही;

पण याच कंत्राटदाराला हे काम मिळावे, यासाठी पालिकेने नोंदणी करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली आहे. या अजब प्रकारामुळे पालिकेतील अधिका-यांचे डोळे चक्रावले आहेत.

राज्य सरकारचा महापालिकेचा दबाव

सँडर्हस्ट रोड, डोंगरी आणि दादर, माटुंगा, माहीम येथील 12 सफाई कामगार वसाहतींचे काम शायोना कॉर्पोरेशनला देण्याचा घाट घातला आहे;

पण स्थायी समितीत विरोधी पक्षाच्या विरोधामुळे हा प्रस्ताव रोखून धरण्यात आला आहे. ठाण्यातील एका बड्या राजकीय नेत्याने या कंत्राटदाराला कंत्राट मिळावे यासाठी राज्य सरकारमार्फत मुंबई महापालिकेने प्रशासनावर दबाव टाकल्याचे समजते.

पाच टक्के रक्कम आगाऊ

पुनर्विकासाच्या दोन्ही प्रस्तावात संकल्प चित्र, योजना कार्यपद्धती, संरचनात्मक आराखडे सादर केल्यानंतर शायोना कॉर्पोरेशनला कंत्राटाच्या पाच टक्के आगाऊ पैसे दिले जाणार आहेत.

दादर, प्रभादेवीत याच प्रकल्पातील वसाहतींचे काम करणा-या बी. जी. शिर्के कंपनीला एक टक्के आगाऊ रक्कम दिली जाणार आहे.

तफावतीमुळे शायोना कंत्राटदाराला झुकते माप दिले जात असल्याचे स्पष्ट होते.

You might also like
2 li