मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नोटीस (Notice) पाठवल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याचे बांधकाम अनधिकृत (Construction unauthorized) असल्याची तक्रार करण्यात आली होती.

राज्यात शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) टीका सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिका निआवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे.

नारायण राणे यांनी मुंबईतील जुहू (juhu) परिसरात असलेल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार होती. त्यामुळे तपास करण्यासाठी महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे.

Advertisement

नारायण राणे यांच्या ‘अधीश’ (Adhish) या बंगल्याचे बांधकाम अनधिकृत झाल्याची टाकणार मःअप्लिकेला मिळाली होती. बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे.

याच तक्रारीवरून बंगल्याच्या बांधकामाची चौकशी होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे.

महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचे पथक आज त्यांच्या बंगल्यात जाऊन तपासणी करेल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

महापालिकेचे पथक आज बंगला आणि परिसराची पाहणी करून मोजमाप करेल तसेच त्याचे फोटो काढतील. ज्यावेळी पालिकेचे पथक तपासणीसाठी येईल त्यावेळी तुम्ही बंगल्याची कागदपत्र घेऊन तिथे हजर राहा, असेही नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.