पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune express way) महामार्गावर नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली असून, संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगदा याठिकाणी पुण्याच्या दिशेने जाणार्‍या एका ट्रकला अचानक शाॅर्ट सर्किट होऊन आग लागल्याने ट्रक जळून (truck fire) खाक झाला. रात्री 2.30 वाजता ही घटना घडली असून, या ट्रकचा नंबर RJ 27 GD 4866 असा आहे.

किलोमिटर 41.00 च्या दरम्यान रात्री ही घटना घडली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने हा ट्रक निघाला असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागली. गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजुला घेतली.

तर हे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि खोपली नगरपालिकेची फायर ब्रिगेड यंत्रणा घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवली.

दरम्यान, या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नसून चालक आणि त्याचा सहकारी दोघांनाही सुखरूप बाहेर (Mumbai Pune Expressway) काढण्यात यश आले.

या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पुणेकडे जाणारी वाहतूक 2.40 ते 3.10 बंद करण्यात आली होती. आणि त्यामुळे महार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्मण झाली होती. दरम्यान, या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण ट्रक जाळून (truck fire) जागीच खाक झाला आहे.

मुंबई-पुणे मार्गावर धावती शिवशाही बस पेटली:

यापूर्वी देखील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एसटी महामंडळाच्या शिवाशाही (Shivshahi bus) बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या सुमारास खंडाळा घाटात मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या शिवशाही बसला (Shivshahi bus) अचानक ही आग लागली असून, या भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली न्हवती.