पुणे – मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. महामार्गावरील बोरघाटात वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर तीन ते चार किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा (Mumbai Pune Expressway ) लागल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एक तासापासून वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai Pune Expressway) HOC ब्रिज ते अमृतानजन पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. कारण दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत.

विशेषतः चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. अशातच चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्यांची गर्दी मुंबई-पुणे महामार्गावर झाली असून HOC ब्रिज ते अमृतानजन पुलापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या याठिकाणी साप्ताहीक सुट्टी आणि दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याशिवाय, साप्ताहीक सुट्टी निमित्ताने मुंबईकर आणि ठाणेकर मुंबईच्या बाहेर जाताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

परिणामी बोरघाटात वाहनांची रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे दोन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावामुळे जी नियमावली प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात आली होती. ती आता शिथील झाली आहे. त्यामुळे लोकांचा प्रवासही वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. आणि याचा ताण मुंबई-पुणे महामार्गावर आल्याचं चित्र दिसत आहे.