Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

उज्वल निकम, चहल, हिरानंदाणीसह ३१ जणांना मुंबई रत्न

फिल्म्स टुडे, नाना नानी फाउंडेशन व एनार समूहातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 31 निवडक व्यक्तींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई रत्न पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले.

त्यात मुंबई बाँबस्फोटात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले ॲड. उज्वल निकम, गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदाणी यांचा समावेश आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

राजभवन येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात; मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

Advertisement

31 जणांना ‘मुंबई रत्न’ पुरस्कार

राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयंका, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय, डॉ शोमा घोष, आशिष चौहान आदींना या वेळी सन्मानित करण्यात आले.

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व वेदांत समूहाचे अनिल अगरवाल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमाला फिल्म्स टुडेचे अध्यक्ष श्याम सिंघानिया व राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.

 

Advertisement
Leave a comment