मुंबई: इतर मागासवर्गीयांचे आरक्षण पुनर्स्थापित झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेते सांगत असताना

राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त करीत न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे.

ओबीसींवर घोर अन्याय

राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे,

Advertisement

नंदुरबारसह पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे, असे यांनी म्हटलं आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्य सरकारनं न्याय द्यावा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असे वक्तव्य राज्य सरकारमधील मंत्र्यांनीदेखील केले होते.

आम्ही तर याविरूध्द न्यायालयात धाव घेणार आहोत. तथापि, राज्य शासनाने न्याय देण्याची भूमिका तत्काळ घेण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

Advertisement

आमच्यासह कोर्टात धाव घ्या

राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत या निवडणुका न घेण्याची भूमिका मांडण्याबरोबरच आमच्या समवेत कोर्टातही धाव घ्यावी असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.