पुणे : तुम्ही अनेक वेळा जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची (Friend) गोष्ट ऐकली असेल. पण पुण्यात (Pune) मित्रानेच मित्राचा खून (Murder) केल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी (Bibwewadi) परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दारू पिण्यासाठी एकत्र बसल्यानंतर हा वाद झाला होता.

बिबवेवाडीतील महेश सोसायटी (Mahesh Society) चौकातील राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या (Rajiv Gandhi Complex) पार्किंगमध्ये (Parking) हा खून झाला आहे. विशाल भीमराव ओव्हाळ (वय २६, रा. पद्मावती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Advertisement

दत्तात्रेय चंद्रकांत सकट (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे बिबवेवाडी पोलिसांनी (Police) अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. या तरुणाने खून झालेल्या व्यक्तीच्या डोक्यात मारून त्याचा खून केला आहे.

या खुनाबाबत विशालचे चुलते गणेश ओव्हाळ (४६, रा. धनकवडी) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

इंदिरानगर परिसरात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढले आणि त्याच्याकडून माहिती घेतली असता त्यानेच दारू पिताना झालेल्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

या प्रकरणाचा अधिक तपास (Investigation) पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) करीत आहेत.