गुन्हेगारांच्या जवळपास 30 टोळ्यांचा पर्दाफाश केल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. 2021 मधील पहिल्या सहा महिन्यातच पुण्यात हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 139 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 95 ने वाढला आहे. या सहा महिन्यात हत्येची 38 प्रकरणं उघडकीस आली आहेत.

पोलिसांची वाढली डोकेदुखी

एकीकडे नागपूरची क्राईम सिटी म्हणून ओळख होत असतानाच पुणे शहरातही गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांची चिंताही वाढवणारी आहे.

Advertisement

गँगवॉरमुळे पोलिसांना डोकेदुखी

पूर्ववैमनस्यातून भिडणाऱ्या टोळ्यांमुळे यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत 530 गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली होती. गेल्या वर्षा हाच आकडा 410 इतका होता. पुण्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरातही गुन्हेगारी टोळ्या वाढताना दिसत आहेत.

एकमेकांकडे बघितल्याच्या रागातून किंवा जाहीर अपमान केल्याच्या भावनेतून हत्येच्या प्रयत्नाच्या केसेस वाढत असल्याचं क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टोळीयुद्धामुळे वाढली गुन्हेगारी

टोळीयुद्धांमुळे गुन्हेगारी वाढल्याकडेही पोलिसांनी लक्ष वेधलं. बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, भवानी पेठ, येरवडा, वानवडी, सिंहगड रोड या भागात दोन गटांमधील वादाच्या तक्रारी अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Advertisement